ओम श्री गुरू देव दत्त

       मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी श्री गुरुदेव दत्त जन्म झाला. म्हणूनच त्यादिवशी दत्त जयंती दत्त जयंतीचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांमध्ये साजरा केला जातो. लवकरच दत्त जयंती येत आहे श्री गुरुदेव दत्तान विषयी काही माहिती आपण आज घेतोय. तर सगळया सृष्टीचे जनक ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत. ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या त्रिदेवांचे स्थान सर्वोच्च आहे. या तीनही देवांचे अंश म्हणजेच श्री गुरुदेव दत्त.

      दत्त जयंतीच्या दिवशी दत्तांचा नामस्मरण केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. ते भगवान श्री गुरु दत्तात्रेय दत्तात्रेय हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे दत्त आणि अत्रेय दत्त म्हणजेच आत्मा व अत्रेय म्हणजेच अत्रि ऋषींचा मुलगा.

     दत्त जन्मा विषयी अनेक कथा प्रचलित आहे पण त्यापैकी आज एक कथा पण पाहतोय अत्रि ऋषी आणि अत्रि ऋषींची बायको अनुसया हे दोघेही खूपच आदरातिथी  करणारे व अनुसया माता खरंच खूप पतीव्रता होती.बायको अनुसया याची ख्याती अगदी तिन्ही लोकी पसरलेली होत अनुसया ही अत्रि ऋषींची पत्नी खरंचच खूप अगदी निष्ठावान पत्नी होती जी तिच्या घरी आलेल्या कोणत्याही पाहुण्यांना कधीही उपाशी पाठवत नसायची.ही तिची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. तर ब्रह्मा विष्णू महेश हे देव एक दिवस चर्चा करत बसलेले होते आणि त्यांच्या बायका देखील त्यांच्यापुढे होत्या. तर तेव्हा तिथे इंद्रदेव आले व इंद्रदेवांनी सांगितलं की वाचवा वाचवा देवा आपल्याला स्वर्गापेक्षाही खूप कीर्ती अत्रि ऋषी आणि अनुसया मातेची पसरते आहे जर ती कीर्ती अशीच वाढत राहिली तर आपला स्वर्ग त्याखाली दबला जाईल. भगवान शिव म्हणाले ते कसं काय त्याचा काय संबंध इंद्रदेव म्हणाले अत्रि ऋषींची पत्नी अनुसया माता कोणाही अतिथीला बिनमुख जाऊन देत नाही सगळ्यांचे खूप छान आदरा तिथे करते. असं सगळं म्हटल्यावर ती तिथे ज्या त्रिदेवी उपस्थित होत्या त्या म्हणाल्या एवढी कोण अनुसया आहे जी खरंच आदरा तिथे करते आणि पतिव्रता देखील आहे तर तिची परीक्षा तर घ्यायलाच हवी.

       आता तिन्ही देव अनुसया मातेची परीक्षा घेण्यासाठी तिच्या परीने कुठे बाहेर गेले व ब्राह्मणाच्या वेशा मध्ये तिच्यासमोर गेले ब्राह्मणाच्या वेशामध्ये तिच्या समोर गेल्यानंतर तिला म्हणाले आम्हाला खूप भूक लागली आहे आम्हाला जेवायला दे.

       पहिलं तर ते तिला म्हणाले की आम्ही अग्नीने प्रज्वलित झालेला अन्न आम्ही खात नाही. मग तिने सूर्य देवांना विनंती करून त्यांना त्यांच्याकडून शिजवून घेतला आणि त्यांच्या पुढे वाढलं तर त्यांना प्रश्न पडला की आता हिची सत्वपरीक्षा कशी घ्यायचं तर त्यांनी तिच्याकडे इच्छा भोजन मागणी केली इच्छा भोजनाची मागणी केली आणि इच्छा योजनेच्या मागणीमध्ये त्यांनी तिला सांगितलं की तू आम्हाला जेवण विवस्त्र द्यायचा आहेस तिने थोडा वेळ मागितला विचार करू लागले जर हे आपल्याकडे अन्न देखील विवस्त्र मागत आहेत त्यानंतर अग्नीने प्रदीप्त झालेला अन्न खात नाहीत म्हणजे नक्कीच कोणीतरी महापुरुष असणार आहेत जे आपली सत्वपरीक्षा घेण्यासाठी झालेले आहेत ती मनातल्या मनात अत्रि ऋषींचं स्मरण करते आणि त्यांच्यासमोर जाते. त्यांना सांगते की आता मी तुमची मागणी मान्य करते आणि तुम्हाला विवस्त्र होऊन जेवण देते तिने एक दृष्टी त्यांच्याकडे टाकताच त्यांचं अगदी लहान बालकांच्या रूपामध्ये सगळे तिन्ही देव तिला दिसले.

      तर वरती स्वर्गामध्ये तिन्ही देवांच्या देवी वाट पाहत बसले होते की नाही की आपल्या देवांनी अनुसया मातेची परीक्षा घेतली की नाही त्यासाठी ते स्वतः खाली आल्या अत्रि ऋषींच्या पर्ण कुटी बाहेर त्या उभ्या राहिल्या आणि ते हा सगळा प्रकार पाहत होत्या त्यांनी देखील तो चमत्कार पाहून अगदी अचंबित झाल्या.

      अशा रीतीने तिन्ही देव भगवान शंकर भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव तिनेही देव अनुसयाच्या पोटी जन्माला आले नंतर ते देव मूळ स्वरूपात येऊन त्यांनी अनुसया मातेला आम्ही तुझ्या पोटी जन्म घेऊ असे सांगून ते तिन्ही देव निघून गेले. नंतर भगवान ब्रह्मदेव हे चंद्रमाच्या रूपात भगवान शंकर हे दुर्वास ऋषींच्या रूपात आणि भगवान विष्णू हे श्री गुरुदेव दत्तांच्या रूपामध्ये अनुसया मातेचे पुत्र म्हणून ओळखले जाऊ लागले भगवान श्री दत्तात्रयांकडेच शिवानी आणि ब्रह्मदेवांनी त्यांची शक्ती देखील त्यांच्यामध्ये एक रूप झाली आणि भगवान श्री गुरुदेव दत्ता चा जन्म झाल

    तर 2023 ला श्री दत्त जयंती ही 26 डिसेंबर रोजी आहे.

    भगवान दत्तात्रयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला संध्याकाळी झाला त्यामुळे दत्त जयंती ही सगळ्या दत्त धामा मध्ये दत्त जयंतीच्या दिवशी मोठ्या  उत्साहाने साजरी केली जाते

 

Table of Contents

Toggle

 

 

  •  

shree guru dev datta

Leave a Comment

Exit mobile version