गुढीपाडवा हिंदू नववर्षाची सुरुवात

गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे.

हा सण दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो

संपूर्ण भारतात तसेच विशेषता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात

साजरा केला जातो. मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आपल्या दारासमोर गुढी उभारली जाते.

गुढीसाठी लांब दांडीची काठी उभारली जाते. बरेचदा ती काठी वेळूची असते. काठीच्या वर रेशमी कापड शक्यतो नव कापड बांधलं जातं त्यावर साखरेच्या गाठी तोरण वरती झेंडूच्या फुलाचा हार लिंबाचा पाला आंब्याचे डहाळे बांधले जातात. व त्यावरती तांब्याचा कलश त्याला हळदीकुंकवाचे पाच बोटे ओढून त्या लांब दांडी वरती बांधला जातो. गुढीला हळदी कुंकू आणि नैवेद्य अर्पण करून गुढीच्या पाया पडतो. गुढी ही मांगल्याचे विजयाचे प्रतीक मानले जाते. मराठी नववर्षामध्ये गुढीपाडवा हा प्रथम दिवस मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान श्रीराम पुन्हा अयोध्या मध्ये परतले त्यानंतर त्यांच्या आनंदासाठी सगळीकडे गुढ्या उभारून आनंद साजरा केला जातो.

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो.

या दिवशी बऱ्याचदा नवीन खरेदी असेल. काही किंवा नवीन वस्तूंची घराची खरेदी ह्या दिवशी नक्की केली जाते. गुढीपाडवा हा आनंदाचा सण आहे. त्यादिवशी सगळीकडे गोडधोड करून श्रीखंड पुरी असेल पुरणपोळी असेल सगळीकडे गोडधोड करून तो सण प्रत्येक जण आपापल्या परीने आनंदाने साजरा करतो.

गुढीपाडवा हा आपल्याला काहीतरी नवीन करण्याची तसेच आनंद साजरा करण्याची नवीन उमेद आपल्याला देत असतो.

अशा वेळेस सगळेजण गुढीपाडवा आनंदाने साजरा करतात. सगळेजण आपल्या घरासमोर गुढी उभारून रांगोळ्या काढून घरात गोडधोड करून गुढीला गुळ खोबरे आणि कडूनिंब याचा नैवेद्य दाखवून ती गुढी पुन्हा सूर्यास्ताच्या वेळी उतरवतात.

अशा पद्धतीने बऱ्याचदा महाराष्ट्रा मध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो.

Leave a Comment