मकर संक्रांती २०२४ मराठी माहिती/Makar Sankrati 2024 Marathi Mahiti

वर्षाच्या सुरुवातीला नवीन वर्षी कोणता सण येतो तर मकरसंक्रांती. महाराष्ट्रात मकरसंक्रांती मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. वर्षाच्या सुरवातीला येनारा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांती तर ह्यावर्षी मकर संक्रांती २०२४ विषयी आपण माहिती घेणार आहोत. मकर संक्रांती २०२४ मराठी माहिती
मकर संक्रांत म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश करत तो दिवस.
सूर्य हा ग्रहांचा राजा आहे आणि तो मकर संक्रांतीच्या दिवशी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो.
२०२४ मध्ये देखील मकर संक्रांत १५ जानेवारी लाच येत आहे गेल्या वर्षी म्हणजे २०२३ ला देखील मकर संक्रात १५ जानेवारी लाच आली होती.
२०२४ मध्ये मकर संक्रांती १५ जानेवारी ला (सोमवार ) येत आहे कारण ग्रहांचा राजा सूर्य रात्री २.४२ वाजता धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल .

मकर संक्रांती का साजरी केली.

मकर संक्रांती का साजरी केली.
सूर्य हा ग्रहांचा राजा आहे आणि तो मकर संक्रांतीच्या दिवशी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्राती नंतर उत्तरायण चालू होते मकर संक्रातीच्या आदल्या दिवशी रात्र खूप मोठी असते दिवस खूप छोटा असतो मकर संक्रांती नंतर दिवस हळूहळू वाढत जातो.

मकर संक्रांती जास्त करून १४ तारखेला येते पण कधी कधी १५ जानेवारी ला देखील येते .
मकर संक्रांती च्या दिवशी सगळे जण तीळ आणि गुळ एकत्र करून त्याचे लाडू बनवून एकमेकांना वाटतात व एकमेकांना आदराने नमस्कार करून “तिळगुळ घ्या,गोडगोड बोला” असे बोलून एकमेकांना शुभेच्छा देतात.
हि परंपरा खूप वर्षांपासून सुरु आहे


चुकूनही घालू नका ह्या रंगाची कपडे

दरवर्षी मकरसंक्रातीला कोणत्या रंगाचे कापड वापरावे म्हणजे मकरसंक्रातीला देवी कोणत्या रंगाचे कापड घालून आली आहे त्याच्यावर आपण कोणती कपडे घालायची ते अवलंबून असत ह्यावर्षी देवी काळ्या रंगाचे कापड घालून अली आहे.
म्हणजे आपण काळ्या रंगाचे कापड वापरायचे नाही.
तर चला पाहूया आपण कोणत्या रंगाचे कपडे घालू शकतो. तर दरवर्षी मकर संक्रांती ला सर्वांकडे हळदी कुंकू असते तेर आपण लाल रंगाचे कपडे घालू शकतो लाल रंग सुवसीनसाठी अतिशय शुभ मानला जातो. आपण हिरव्या रंगाचे कपडे घालू शकतो. हिरवा रंग देखील हळदीकुंकवाच्या दिवशी खूपच शुभ मानला जातो त्याच बरोबर आपण केशरी कलर घालू शकतो त्याचबरोबर आपण पिवळ्या रंगाचे कपडे देखील घालू शकतो गुलाबी रंगाची कापडे आपण घालू शकतो.

 

भोगीचे विशेष महत्व

   मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. भोगीच्या दिवशी शेतातील सर्व भाज्या गोळा करून त्याची मिळून एकत्र एक भाजी बनवली जाते त्यामध्ये तीळ मिक्स केले जातात. तिळाची भाकरी बनवली जाते. तिळाची चटणी बनवली जाते.

सर्व जण पतंग उडवून आनंद घेतात छोटया पासून मोठ्यानं पर्यंत सर्व जण पतंग उडवून आनंद घेत असतात. सर्व जण एकमेकांना तिळगुळ देऊन शुभेच्छा देत असतात शुभेच्छा देऊन झाल्या नंतर पतंग उडवून आपला आनंद द्विगुणित करतात. ह्यावर्षी देखील सर्वानी मकरसंक्रात आनंदाने साजरी करून आनंद घ्या.

तर आपण थोडा मकर संक्रांतीचा इतिहास पाहूया
भारतात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते त्यामुळे भारतातील सण सुद्धा कृषी किंवा शेतीशी भोवतीच फिरत असतात. मराठी दहावा महिना आहे पौष आणि ह्याच महिन्यात येणारी संक्रांत मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो. तशी तर संक्रांत प्रत्येक महिन्याला येत असते. प्रत्येकच वेळेस सूर्य एका राशी तुन दुसऱ्या राशीत प्रवास करत असतो. पण जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा उत्तरायण चालू होते त्यावेळेसचे वातावरण एकदम उत्साही असते शेतातील पीकही काढणीला आलेली असतात त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील उत्साहाचं आनंदच वातावरण असत. आणि ह्यामुळेच मकरसंक्रांत खूप आवडीने सगळी कडे साजरी केली जाते.

तुम्हा सर्वांना माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा तो पर्यंत मकरसंक्रांत चा आनंद घ्या.

 

 

Leave a Comment